1. SP-KMB हे डेक्सट्रोज आधारित जैवखत आहे, जे पोटॅश-मोबिलायझिंग बॅक्टेरियाच्या निवडक सूक्ष्मजीवांपासून तयार केले जाते .
2. हे फॉर्म्युलेशन पिकांचे प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) सुधारते , फळांचे प्रोटीन synthesis वाढवते , धान्याची गुणवत्ता सुधारते, आणि पिकांच्या संरक्षण यंत्रणेस बळकटी देते.
3. हे बॅक्टेरिया मातीतील पोटॅशियम उपलब्ध करून देते , ज्यामुळे पिकांना त्याचा फायदा होतो.
4. हे मुळांच्या जवळ कार्य करते आणि पिकांची वाढ व उत्पादनावर सकारात्मक परिणाम घडवते .
5. हे फॉर्म्युलेशन पर्यावरणस्नेही आहे.
कार्यपद्धती:
– हे बॅक्टेरिया काही सेंद्रिय अम्ल जसे की सिट्रिक एसिड , मॅलिक एसिड , फॉर्मिक असिड इत्यादीचे उत्पादन करतात, जे पिकांच्या मुळांतील स्रावांसोबत मिळून मातीतील पोटॅशियमला पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचवतात.
– पोटॅशियम हे पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक पोषक घटक आहे, आणि हे बॅक्टेरिया मातीतील जलविरघळणारे व परिवर्तनक्षम पोटॅशियम पिकांच्या मुळांपर्यंत नेण्याचे कार्य करतात.
ड्रीपद्वारे देण्याचे प्रमाण:
– 200 ग्रॅम प्रति एकर
शिफारस:
– भाजीपाला पिकांसाठी, फळ पिकांसाठी, रोख पिकांसाठी, धान्य, कडधान्ये, तेलबिया यांसारख्या पिकांसाठी उपयुक्त आणि प्रभावी.





